अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या समस्या बाबत व्यक्त केलेल्या नाराजी नाट्यानंतर नगरपरिषद प्रशासन व कंत्राटदार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू
प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीतील एका नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहातील एसी व साऊंड सिस्टिम बाबत नाराजी व्यक्त केली होती नाटकाच्या वेळी एसी सिस्टीम बंद असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आपण पुन्हा नाटकाच्या प्रयोगासाठी रत्नागिरीत येणार नसल्याचे जाहीर केले होते त्यामुळे त्यावरून आता वाद सुरू झाला आहे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबल यांच्या मते ही चूक आयोजकांची होती त्यांनी डिझेलचे योग्य ते नियोजन न केल्याने नाट्यगृहातील यंत्रणा बंद पडली होती त्यामुळे समस्या निर्माण झाली नाट्यगृहातील यंत्रणा सुस्थितीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे स्वच्छतागृह टाप टीप असल्याचे त्यांनी सांगितले नाटकाच्या आयोजकांनी तीन तासाच्या हिशोबाने डिझेलचे व्यवस्था केली होती मात्र नाटक साडेचार तासावर गेल्याने डिझेल संपले आणि नाट्यगृहातील यंत्रणा बंद पडली याची कल्पना आयोजकांना देण्यात आली होती असाही दावा त्यांनी केला
यात उगाचच नगर परिषदेवर चुकीचे खापर फोडले जात असल्याचे सांगून नगरपरिषदेची बाजू सावरून घेतली आहे
मात्र बाबर यांच्या खुलासावर आयोजकांनी देखील आता हरकत घेतली आहे नगर परिषदेच्या आरोपाचे आम्ही खंडन करतो मुळातच नाटक सव्वा दोन तासाचे होते त्यामुळे डिझेलचा कमी पुरवठा झाला हे नगर परिषदेचे म्हणणे चुकीचे होते नाटकाच्या दरम्याने एसीची यंत्रणाच कार्यान्वयेत होत नव्हती त्यामुळे कलाकारांबरोबर प्रेक्षकही घामाघुम झाले होते असे आयोजकांचे म्हणणे आहे त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन व कंत्राटदार यांच्यातील वाद रंगला आहे
www.konkantoday.com