निनावी फोन आल्याने एका २४ वर्षीय तरुणाशी अल्पवयीन मुलीशी होणारा विवाह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोखला, चिपळूण परिसरातील प्रकार
दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने २४ वर्षीय तरुणाशी एका अल्पवयीन मुलीचे लग्न पोलिसांना करण्यात आलेल्या निनावी फोन मुळे टाळण्यात यश आले रविवारी चिपळूण शहरातील गुहागरकडे जाणाऱ्या मार्गावर हा धक्कादायक प्रकार सुरु होता. याविषयीची निनावी फोनवरून एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि हा विवाह रोखण्यात आला.
एका २४ वर्षीय तरुणाशी त्या अल्पवयीन तरुणीचा विवाह आयोजित केला होता. यासाठी
मुलासह मुलीकडील दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह ठरला होता. त्यानुसार ल ग्नपत्रिका सर्व पाहुणे, मित्रपरिवार, आप्तेष्ट मंडळींना दिली होती. सोमवारी सकाळी विवाहस्थळी वऱ्हाडी मंडळी जमली होती. अशावेळी त्या मुलीचे विवाहासाठीचे वय बसत नसल्याची निनावी तक्रार जिल्हा पोलिसांकडे आली. त्यानुसार चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हा विवाह रोखला आणि अल्पवयीन मुली सह विवाह इच्छुक तरुण व त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले
www.konkantoday.com