लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी चाललेल्या इसमाचा विहिरीत घसरून पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील खुर्दे येथे राहणारा जगन्नाथ रामचंद्र म्हादे (५०) हे आपल्या मित्रांसोबत लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गणेशगुळे येथे तोडणकर यांच्याकडे पायवाटेने जात असताना वाटेत हरिश्चंद्र तोडणकर यांच्या पडीक विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात पडले. दरम्याने तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले व त्यांना अधिक उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना शासकीय रूग्णालयात हलविण्यास सांगितले. शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
www.konkantoday.com