शेतकरी बागायतदार माकडांच्या या उपद्रवाने हवालदिल
माकडांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे हा माकडांचा उपद्रव शेतक-यांची आर्थिक हानी करणारा आहे. यामुळे शेतकरी बागायतदार माकडांच्या या उपद्रवाने हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या शेतीपिकाच्या लागवडीची नासधुस करणाऱ्या उपद्रवी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाकडे कोणतीही सक्षम अशाप्रकारची उपाय योजना शासनस्तरावर कार्यान्वित नसल्याने शेतकऱ्यांच्या शेती आणि फळ पिकांचे वन्य प्राण्यांकडून अतोनात नुकसान होत आहे. वानर, केळटी हे वन्य प्राणी आंबा, काजू फळांचे तर नुकसान करतातच शिवाय लागवड केलेल्या फळझाडांच्या रोपांची नासधूस करतात त्यामुळे फळझाडांच्या रोपांचे नुकसान होत आहे. याबाबत नुकसानीची वन विभाग अथवा कृषी विभागाकडे कोणतीही मोजदातीची यंत्रणा नसल्याने झालेले नुकसान कागदावर येत नाही. कागदावर नुकसानीचा आकडा येत नसल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थचक्राच्या संकटातून पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस अशाप्रकारचे विनापरतावा अनुदान देवून दिलासा देण्याचे काम शासनाने करावे अशाप्रकारची मागणी दापोली तालूक्यातील शेतकरी आंबा बागायतदारांकडून होत आहे
www.konkantoday.com