क्रशरच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांचे एक मे पासून आमरण उपोषण
गेली अनेक वर्षे मुरादपूर येथील उलटाचा पऱ्या येथील क्रशर सुरू आहे. भूसुरूंगही येथे लावण्यात येत आहेत.यानंतर येथील घरांना भेगा पडल्या आहेत. तसेच डोंगर भागालाही तडे गेले असून, पावसाळ्यात भूस्खलन होण्याचा व कुटुंबांना मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी अनेक वर्षे जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म विभागाला तसेच तहसीलदार संगमेश्वर यांना पत्रव्यवहार केला होता. याबाबत ग्रामस्थांनी उपोषण केले होते . जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यांनी भूसुरूंगाद्वारे उत्खनन करू नये, असे आदेश दिले होते. तेव्हा उपोषण मागे घेण्यात आले होते; परंतु तरीही क्रशर सुरूच असल्याने ग्रामस्थांनी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com