
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉपचे डम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्याला आग परिसरात धुराचे साम्राज्य
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राउंड वर रत्नागिरी शहरातील कचरा साठवला जातो या साठवलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याने या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते या ठिकाणी असलेल्या कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार याआधीही अनेक वेळा घडले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुका कचरा साठवला जातो त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर आहे 27 तारखेला दुपारी या कचऱ्याला अचानक आग लागल्याने रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र उन्हाळ्यामुळे व वाऱ्यांमुळे ही आग दुमसत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना धुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे रत्नागिरी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केले जाण्याचे आश्वासन दिले जात आहे मात्र प्रत्यक्षात त्यावर कोणतेही कार्यवाही होत नसल्याने आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे
www.konkantoday.com