शुल्क विभागाचे वस्तू व सेवाकर भरल्यानंतर शारजाचे ‘बसरा’ जहाज हटवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता
रत्नागिरी शहरालगतच्या मिर्या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार आहे. भंगार साहित्य काढून पूर्णपणे हटल्यानंतर तेथील टेट्रापॉडचा बंधारा टाकण्यातील अडथळाही दूर होणार आहे.
शारजाचे ऑईल टँक बसरा जहाज डिझेल घेऊन श्रीलंकेकडे जात होते. ३ जून २०२० रोजी निसर्ग वादळाचा धोका असल्याने हे जहाज आश्रयासाठी रत्नागिरी शहरातील भगवती बंदरात आले होते. नांगर टाकून हे जहाज समुद्रात उभे होते.
समुद्रातील जोरदार वारे आणि लाटांच्या मार्याने या जहाजाचा नांगर तुटला आणि हे जहाज भरकटत मिर्या-पंधरामाड समुद्रकिनारी खडकात येऊन अडकले. तब्बल ३ वर्षे हे जहाज याच ठिकाणी अडकून आहे.
पाऊस आणि समुद्री लाटांच्या तडाख्यांनी हे जहाज पूर्णपणे निकामी झाल्याने ते भंगारात काढण्यात आले. स्थानिक उद्योजकाने हा व्यवहार केला. त्यानंतर शासन स्तरावरील प्रक्रिया सुरू झाली. ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाचे वस्तू व सेवाकर भरल्यानंतर हे जहाज तेथून हटवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com