वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी 18 हजार रुपयाची लाच घेताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले
दापोली उप जिल्हा रुग्णालय, दापोली, ता. दापोली, येथील वैद्यकीय अधिकारी, वर्ग – २ डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांना 18 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 29 वर्षे तरुणाने तक्रार केली होती त्याप्रमाणे यातील तक्रारदार यांचे वडिलांचा शस्त्र परवाना नुतानिकरण करणेचा होता, त्याकामी तक्रारदार यांचे वडीलांची वैद्यकीय तपासणी होऊन त्या बाबत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. त्या बदल्यात डॉ. कुराडे यांनी सदर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 20,000/- रु लाच रकमेची मागणी केली होती. तडजोडी अंती 18,000/- रु लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारताना आरोपी यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यातआलेले आहे.
www.konkantoday.com