रिक्टोली इंदापूरवाडीमधील निर्मला सदाशिव शिंदे या ७५ वर्षीय वृद्धेचा खून करून फरारी झालेल्या आरोपीला अटक
चिपळूण शिरगाव येथील रिक्टोली इंदापूरवाडीमधील निर्मला सदाशिव शिंदे या ७५ वर्षीय वृद्धेचा खून करून तिच्या कानातील कुडी चोरून फरार झालेल्या आरोपीला अखेर ११२ क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरुन आलेल्या कॉलमुळे अटक करणे सोपे झाले. मंगळवारी मध्यरात्री तिवरे डोगरात असलेल्या धनगरवाडी जवळील जंगलातून आरोपीला चिपळूण व शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. काल बुधवारी त्याला चिपळूण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रिक्टोली इंदापूरवाडीत श्रीमती निर्मला सदाशिव शिंदे
(७५) या एकट्याच आपल्या घरात हात्या. दि. १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वा. ते दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. चे मुदतीतदोन्ही दरवाजे आतून बंद करुन झोपलेल्या असताना आरोपी प्रशांत प्रकाश शिंदे (३०, रा. रिक्टोली इंदापूरवाडी) याने मयत निर्मला शिंदे यांच्या घराचा मागील सिमेंटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करुन माजघरात झोपलेल्या शिंदे यांचे नाक, तोंड उशीने दाबून त्यांना ठार मारुन त्यांच्या दोन्ही कानातील सोन्याच्या कुड्याची चोरी केली. आरोपी प्रशांत शिंदे याने तपास करणाऱ्या पोलिसांची गाडी पाहून दुसऱ्या दिवशी दुचाकी व बॅग रस्त्यात टाकून जंगलात पोबारा केला होता. तेथून तो मुंबईत गेला असल्याचे समजते परंतु तेथे कोणी आधार न दिल्याने तो परत गावी आला. तो खेड तालुक्यातील सापिल गावातून डोंगर चढून तिवरे धनगर वाडीत आला असावा. तो गावात आल्याचे अज्ञात व्यक्तीने चिपळूण भ्रमणध्वनीवरुन पोलिसांना कॉल करून कळविले त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व रत्नदीप साळोखे यांच्या अलोरे चे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश शिंदे, गणेश नाळे, दिलीप पवार यांनी हालचाली सुरु केल्या. त्यांच्या मदतीला चिपळूणचे हवालदार वृषाल शेटकर, पोलीस नाईक अतुल ठाकूर, राकेश जाधव, गणेश शिंदे होमगार्ड यादव यांनी तीवरे पोलीस पाटील नागेश शिंदे ग्रामस्थ लक्ष्मण हिरवे सचिन शिंदे यांच्यासह पायपीट करीत धनगरवाडी येथील जंगलात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या
www.konkantoday.com