
गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांनी घेतले गणपतीपुळेत श्रींचे दर्शन
रत्नागिरी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त बुधवारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
या मंदिरात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी श्री गणेश जयंतीचे असल्याने मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शेकडो भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले.