तेव्हा वैचारिक बेरोजगार, कर्तव्यशून्य खासदार हे कुठल्या सुपारिच्या बागेत सहलीला गेले होते मनसेची खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका
रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्पांच्या संदर्भात बारसू येथील जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.मात्र, या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. स्थानिकांना या प्रकल्पाला केलेल्या या विरोधानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले आहे. यावरूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मात्र या प्रकल्पाच्या जागेच्या निवडीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र व्हायरल होत आहे.
याच वादात आता महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने(MNS) उडी घेतली आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांच्या पत्रावरून आता महाविकास आघाडीला प्रश्न विचारण्यात येत आहेत. मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.
“12 जानेवारी २०२२ रोजी महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील जमीन ही रिफायनरी प्रकल्पाकरीता वापरण्यायोग्य आहे, व या प्रस्तावाचा विचार करावा, अशा आशयाचे पत्र लिहले होते. तेव्हा वैचारिक बेरोजगार, कर्तव्यशून्य खासदार हे कुठल्या सुपारिच्या बागेत सहलीला गेले होते. कोकणवासीयांशी खेळणं बंद करा, असे मनसेचे अभ्यंकर म्हणाले आहेत?
www.konkantoday.com