
खेड तालुक्यातील छप्पर कोसळलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची अजूनही शाळेकडे पाठ
खेड तालुक्यातील शिरवली नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याने धोकादायक स्थितीतील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालक तयार नाहीत. जोपर्यंत शाळेच्या वर्गखोल्यांची दुरूस्ती होवून अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत एकाही विद्यार्थ्यास शाळेत न पाठवण्याच्या निर्णयावर पालक ठाम राहिल्याने तिसर्या दिवशीही विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली.या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून तीन वर्गखोल्यांचे छप्पर कोसळले आहे. यामुळे पालकांनी आक्रमक भूमिका घेत शिक्षण विबागाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत एकाही पाल्यास शाळेत न पाठवण्याची भूमिका घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रानुसार ५ लाख ४५ हजार रुपये मार्च २०२१ रोजी सर्व शिक्षा अभियान जि.प.च्या नावे ही रक्कम जमाही करण्यात आली होती. मात्र तरीदेखील शिरवली नं. १ प्राथमिक शाळेच्या धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांची दुरूस्ती का करण्यात आली नाही, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. www.konkantoday.com