
ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या, खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक या दोघांच्याच गाड्या सोडण्यात आल्या
सध्या बारसू रिफायनरीच्या प्रश्नावरून राज्यात राजकीय वातावरण ही तप्त झाले आहे काल या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार विनायक राऊत व अन्य पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली त्यानंतर आज विनायक राऊत बारसू येथे ग्रामस्थांना भेटण्यास आले आहेत आम्ही ग्रामस्थांच्या बरोबर राहणार अशी शिवसेनेची भूमिका आहे बारसूमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव यांच्यासह ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बारसूपासून ५ किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी अडवल्या.बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी खासदार राऊत आणि आमदार नाईक या दोघांच्याच गाड्या सोडण्यात आल्या.
बुधवारी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बारसूकडे जाणार असल्याची तयारी करत होते. त्यामुळे रत्नागिरी शहर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई करणारा प्रतिबंधात्मक आदेश बजावला. मात्र तरीही हे पदाधिकारी तसेच खासदार विनायक राऊत आणि मालवणचे आमदार वैभव नाईक बारसूकडे रवाना झाले.
बारसूपासून ५ किलोमीटर अंतरावर धारतळे येथेच पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडवल्या. लोकप्रतिनिधी म्हणून तेथे जाण्याचा आग्रह या पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यामुळे खासदार राऊत आणि आमदार नाईक या दोघांच्याच गाड्या पुढे सोडण्यात आल्या.
www.konkantoday.com