ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेसाठी जनताच बाहुबली झाली चक्क रुग्णा सह रुग्णवाहिका उचलून वाट करून दिली

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक स्थितीत असलेले शिल्लक काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी मंगळवारपासून दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत घाटातील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र घाट बंदे करताच पर्यायी लोटे-चिरणी आंबडस मार्गावर प्रचंड वाहनचालकांना वाहतूककोंडीला समोर जावे लागले. एकेरी मार्ग व रस्त्याचे कामही अर्धवट स्थितीत असतानाच अवजड वाहने सोडल्याने दीड तास भर उन्हात ताटकळत रहावे लागले. यामध्ये रुग्णवाहिकाही अडकल्याने गोंधळ माजला. सुमारे ८० वाहनचालक व प्रवाशांनी रुग्णवाहिका चक्क उचलून तिचा मार्ग बदलला आणि आंबडसमार्गे ती मुंबईकडे रवाना केली. . परशुराम घाट सुमारे पावणेसहा
कि.मी. लांबीचा असून त्याचे बहुतांशी काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून तेथील वाहतूकही सुरळीत सुरु आहे. उर्वरित शिल्लक काम धोकादायक डोंगर-उतार व दरडीमुळे अडचणीचे बनल्याने व पावसाळाही जवळ आल्याने त्यापूर्वीच ते काम पूर्ण करण्यासाठी मंगळवारपासून १६ दिवस घाटातून दुपारी १२ ते ५ या दरम्यान वाहतूक बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. लोटे, कळंबस्तेसह अन्यत्र पोलीस उभे ” करून वाहतूक बंद करण्यात आली. या दरम्यान घाटातील डोंगर पोखरण्याचे काम वेगाने सुरू आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button