संगमेश्वर तुरळ मध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत दोन गटात हाणामारी

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दोन गटांमध्ये वाद उफाळून हाणामारी झाली.या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.पोलिसांनी दोन्ही गटातील वाद शांत केल्यानंतर गणपतींचे विसर्जन पार पडले.हा प्रकार तुरळ गावातील गुरववाडीतील विसर्जन मिरवणुकीत घडला.यातील एका गटाच्या म्हणण्या नुसार त्यांचा गणपती दरवर्षी मिरवणुकीत पुढे असतो मात्र दुसऱ्या गटाने आपला गणपती या वर्षी पुढे नेला यावरून सुरुवातीला मुलांच्या मध्ये वाद सुरू झाले आणि त्यात मोठ्यांनी भाग घेतला व एकमेकांना मारहाण व शिवीगाळ केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटातील लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button