
मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांची तोंडे आता बंद झाली आहेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला
मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांची तोंडे आता बंद झाली आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात कोविड योद्धांच्या सन्मान मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला
काही लोकांनी पोलिसांची बदनामीचा प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडे बंद झाली आहेत. पोलिसांचे कर्तुत्व सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com