
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलक एकवटले, शेकडो आंदोलक बारसूच्या रानमाळावर जमले
कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परिक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात आज होणार आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. बारसू सोलगाव परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही लोक इथे गोळा झाले आहेत.
शेकडो आंदोलक एकवटले
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलक एकवटले असून शेकडो आंदोलक बारसूच्या रानमाळावर जमा झाले आहेत. जोपर्यंत सर्व्हे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन पुकारणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
www.konkantoday.com