
दोन महिन्याचा मेगा ब्लॉक घेवूनही वरंध-भोर घाटात पडझड सुरूच
म्हाप्रळ-वरंध- भोर- पंढरपूर मार्गावरील भोर घाटातील सतत होणारी पडझडीसह अंतर्गत दुरूस्तीच्या कामांसाठी तब्बल दोन महिन्यांचा मेगाब्लॉक येवूनही भोर घाटातील पडझड सुरूच आहे. भोर घाटाला ताम्हाणी व आंबेनळी घाटाचे दोन लगतचे पर्यायी मार्ग असून या मार्गाच्या वापरामुळे सुरक्षा उपाययोजनेनंतरही अपघातांचा धोका कायमच असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. हा घाट दोन महिने बंद राहिल्यामुळे माणगांव, निजामपूर, ताम्हिणी घाट व पोलादपूर महाबळेश्वर वाई ते पुणे बंगलोर द्रूतगती महामार्ग या पर्यायांचा अवलंब करण्यात आला होता. www.konkantoday.com