कोकण रेल्वेतील (टीसीना) तिकीट तपासनिकांना मिळणार अत्याधुनिक एचएचटी मशिन
कोकण रेल्वेने ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकत कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांतील तिकीट तपासनिकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे तिकीट पर्यवेक्षकांना आता कागदावरील छापील आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. रेल्वे सुटल्यानंतर कोणतेही तिकीट रद्द झाल्यास पर्यवेक्षकांना त्याची माहिती मिळणार आहे.
यापूर्वी मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, एर्नाकुलम या एक्स्प्रेस गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांकडून एचएचटी मशिनची सुविधा वापरली जात होती. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील तिकीट तपासनिकांना
एचएचटी मशिन देण्यात येणार आहे. आरक्षण स्थिती तपासण्यासह पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी तसेच तिकीट तपासण्यासह सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. या मशिन रेल्वेच्या सर्व्हरशी जोडल्या जाणार असल्याने सीटसंदर्भातील प्रत्येक अपडेट मिळूनकारभारात पारदर्शकता येईल डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व तिकीट तपासनिकांना देण्यात येणाऱ्या यंत्रांमुळे कागदाची बचत बचत होऊन होऊन कारभार पर्यावरणपूरक व त्यात पारदर्शकताही येईल.
www.konkantoday.com