
चीपी विमानतळावर टेकऑफ नंतर विमानात बिघाड, सुरक्षित रित्या धावपट्टीवर विमान उतरवले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही मिनिटातच विमानात बिघाड झाल्याने विमान परत लँडिंग करण्याची घटना मंगळवारी सायंकाळी चीपी विमानतळावर घडली विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवण्यात आले मात्र विमानसेवा रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली सध्या चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा आठवड्यातून ठराविक वारी सुरू असते मंगळवारी नियोजित विमान दुपारी नेहमीच्या वेळेत न येता सायंकाळी चार वाजता चीपी विमानतळावर लँड झाले त्यानंतर सिंधुदुर्गातील प्रवाशांना मुंबईकडे घेऊन जाण्यासाठी विमान निघाले मात्र टेकऑफ नंतर काही मिनिटातच त्यात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे विमान परत धावपट्टीवर उतरण्यात आले त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यानंतर तांत्रिक कारणामुळे बिघाड झाल्याचे सांगून विमान रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली
,www.konkantoday.com