विक्रमी वसुली सह सातत्यपूर्ण, वर्धिष्णू अर्थकारण करणारी पतसंस्था ही बिरुदावली दिमाखात मिरवता येईल असे सन २०२२ -२३ चे स्वरूपानंद चे रिझल्ट – ॲड. दीपक पटवर्धन


सन २०२२-२३ हया आर्थिक वर्ष अखेरीचा लेखा जोखा सादर करताना खूप समाधान व आनंद वाटतो. प्रतिवर्षीप्रमाणे सन २०२२-२३ हया आर्थिक वर्षात विक्रमी वसुलीचा आपला पायंडा कर्जदारांच्या सहकार्याने कायम राखत ९९.६१% वसुली करण्यात संस्था यशस्वी झाली असून संस्थेच्या १० शाखांची वसूली १००% झाली आहे. २२५५६ कर्जदारांपैकी फक्त ४० कर्जदार थकीत राहिले असून संस्थेचा नेट N.P.A 0% ठेवण्यात संस्थेला यश प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर या वर्षी झालेल्या उत्तम वसुलीमुळे संशयीत कर्जापोटी नव्याने तरतूद करावी लागली नाही. ही गोष्ट खूप बोलकी आहे.
४४७ कोटींचा संमिश्र व्यवसाय
आर्थिक वर्षात संस्थेचे येणे कर्ज रु.१८२ कोटी झाले असून गतवर्षीपेक्षा १२ कोटींची वाढ एकूण कर्ज व्यवहारात झाली.
ठेवींमध्ये ही सन २०२२-२३ ह्या आर्थिक वर्षात १५ कोटींची वाढ झाली असून वर्षअखेरीचे दिवशी रु.२६५ कोटी ठेव या संस्थेकडे सुमारे ७६ हजार ५२७ ठेवीखात्यांचे माध्यमातून जमा आहे.
संस्थेची गुंतवणूक २०२२-२३ अखेर रु.१३१ कोटी इतकी लक्षणीय झाली असून संस्थेचा स्वनिधी ३७ कोटी इतका झाला आहे. सन २०२२-२३ ह्या आर्थिक वर्षात संस्थेला रु. ६ कोटी ६१ लाख एवढा निव्वळ नफा झाला असून गतवर्षी पेक्षा या वर्षी रु. ४० लाखाने नफा वाढला आहे.
खणखणीत निव्वळ नफा
सन २०२१-२२ च्या पूर्वार्धात बँक ठेव व्याजदर कमी झाल्याने १ कोटी ५० लाखांचे उत्पन्न कमी झाले तरीही सुरुवातीपासून योग्य नियोजन करत ठेवी उभारणी दर व कर्ज व्याजदर यात प्रमाणबद्ध बदल करत सोनेतारण कर्जाचे प्रमाण वाढवत वर्ष अखेरीला ६ कोटी ६१ लाख निव्वळ नफा प्राप्त करण्यात संस्थेला मोठे यश प्राप्त झाले आहे.
लक्षणीय CRAR
पतसंस्थांना नव्याने CRAR (भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण) ही नवी संकल्पना या वर्षीपासून लागू केली गेली. ९ % CRAR राखणे पतसंस्थांसाठी आवश्यक झाले. स्वामी स्वरूपानंदचा CRAR हा २७% इतका लक्षणीय ठेवण्यात संस्था यशस्वी झाली थोडक्यात देणी भागवण्यासाठी संस्थेकडे पर्याप्त भांडवल क्षमता आहे. याचा अर्थ संस्था आर्थिक दृष्ट्या बलवान आहे. हे २७% भांडवल पर्याप्तता रेशो दर्शवते.
सन २०२२-२३ हया आर्थिक वर्षात पतसंस्थेने अर्थकारणाचे अचूक आकलन करत ठेवींमध्ये प्रमाणबद्ध वाढ करण्याचे धोरण ठेवले. अकारण अतिरिक्त ठेवी जमा न करता आवश्यक त्या संयत प्रमाणात ठेव संकलन करण्याचे धोरण खूप योग्य ठरले हे झालेल्या उत्तम नफ्यावरून सहज लक्षात येते.
व्यापक जनाधार
सन २०२२-२३ अखेर संस्थेची सभासद संख्या ४२ हजार २५० झाली असून संस्थेच्या १७ शाखांचे माध्यमातून हा अर्थव्यवहार होत आहे. संस्थेच्या १७ शाखांनी उत्तम नफा व व्यवसाय वृद्धी केली आहे. नवीन आर्थिक वर्षात ५ ब्रँचेस नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ३०० कोटींचा ठेव टप्पा पार करताना २०० कोटींचा कर्ज टप्पा पार करत संस्थेचा संमिश्र व्यवसाय ५०० कोटी पार करण्यासाठी सन २०२३-२४ या वर्षात प्रयत्न केले जातील. कर्ज मर्यादेत वाढ करणे यासह QR कोड सुविधा सह अन्य डिजिटल बँकिंग सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पावस व चिपळूण येथे संस्थेच्या स्वमालकीचे कार्यालयाचे स्वप्न सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पूर्ण होईल.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकंदरीत आर्थिक वेग मंदावला होता. कोरोना नंतर अर्थकारण स्थैर्य शोधत होतं. अशा आव्हानात्मक कालखंडात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम अर्थकारणाचा नमुना पेश केला. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, अचुकता, उत्तम सेवा या त्रियुक्तीं बरोबर नवीन तंत्रज्ञानाची जोड देत उत्तम अर्थनियोजन करत पतसंस्थेने हे आर्थिक यश मिळवले. ग्राहकांचा विश्वास जपत स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना सर्व ठेवीदार, कर्जदार, पिग्मीदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी प्रतिनिधी, संचालक, सहकारी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे सर्व अधिकारी या सर्वांनी दिलेल्या अनमोल सहकार्यामुळे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थचक्र गतिमान राहिले त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.

🔴 स्वामी स्वरूपानंद सहकारी
पतसंस्था मर्यादित रत्नागिरी
जिल्हा
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य
शाखा;- १७
सभासद संख्या :- ४२२५६
🔴 ३१ मार्च २०२३ अखेरचा
आर्थिक आढावा

▶️ ठेवी २६५ कोटी ०७ लाख
▶️ कर्ज १८२ कोटी ०० लाख
▶️ गुंतवणूक १३१ कोटी ०६ लाख
▶️ वसुली ९९.६१%
▶️ निव्वळ नफा ६ कोटी ६१ लाख
▶️ सी.डी. रेशो ५८.१५%
▶️ स्वनिधी ३६ कोटी ८४ लाख
▶️ खेळते भांडवल ३२० कोटी ८७ लाख

*संस्थेची उत्तम अचूक आर्थिक स्थिती 31 मार्च चे सायंकाळी आपणा सर्वांना सादर करताना मनापासून आनंद होतो *सलग ३२ वर्ष* विश्वासार्ह मार्गक्रमण सतत वर्धिष्णू आर्थिक व्यवहार करत ४२ हजार सभासदांच हे अर्थविश्व सातत्याने विस्तारत आहे. सर्वांचे सहकार्य सदिच्छा व स्वामीकृपेचे छत्र सदैव कायम राहो आणि ही यशदायी वाटचाल सदैव प्रज्वलित राहो ही स्वामीचरणी प्रार्थना🙏
अँड. दीपक पटवर्धन
अध्यक्ष



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button