रॉयल इनफिल्ड बुलेटचा १९ ला रत्नागिरीत थरार

0
89

जगभरात १२२ वर्षापासून विश्‍वसनीय व अत्याधुनिक क्रूजर बाईक सेगमेंटमध्ये मोटरसायकल बनवणारी रॉयल इनफिल्ड कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय कंपनी आहे. ही कंपनी ऑन रोड तसेच ऑफ रोड अशा सर्वोत्तम मॉडेल्स बनवण्यात व अविश्‍वसनीय रायडींग एक्सपिरीयन्स रायडर्सना देण्यासाठी नेहमी कार्यरत असते. रॉयल इनफिल्ड निव्वळ मोटरसायकल विकण्यामध्येच कार्यरत नसून संपूर्ण जगभरात विविध प्रकारच्या रायडिंग ऍक्टीव्हीटी करण्यामध्ये सुद्धा सतत कार्यरत असते आणि रायडर्स लोकांना विविध प्रकारच्या रायडींग स्किल निर्माण करण्यात मदत करत असते. त्याच अनुषंगाने रॉयल इनफिल्ड कंपनी सर्ंपू जगामध्ये विविध प्रकारच्या राईडस आयोजित करत असते.
मुंबई पुण्यात मोठ्या राईडसचे आयोजन नेहमीच केले जाते. अशा प्रकारची मेगा बुलेट राईड प्रथमच रत्नागिरीत गेल्या वर्षी विनायका मोटर्सतर्फे आयोजित केलेली होती. आता १९ मार्च रोजी सकाळी बुलेटचा थरार परत रत्नागिरीकरांना अनुभवयास मिळणार आहे. जागतिक महिला दिन नुकताच साजरा करण्यात आला. आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतामध्ये रॉयल इनफिल्ड कंपनीने वूमन ऍण्ड मेन्स राईडस ऑन च्या स्वरूपात ही बुलेट राईड रत्नागिरीत आयोजित केलेली आहे.
१९ मार्चला सकाळी ९ वाजता विनायका मोटर्स (रॉयल इनफिल्ड बुलेट शोरूम) मधून या राईडची सुरूवात होणार असून आरेवारे मार्गे गणपतीपुळे मालगुंडपर्यंत जावून परत शोरूमला येवून संपणार आहे. या राईडमध्ये प्रथमच लेडी रायडर्स देखील सहभागी होणार असून आतापर्यंत लेडी रायडर्सचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here