रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होवू लागली आहे. या ठिकाणी असलेल्या एकूण ४० रूग्णवाहिकांसाठी सध्या जिल्हा रूग्णालयाकडे फक्त १७ वाहनचालक उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना या रूग्णवाहिकांच्या ऐवजी खासगी रूग्णवाहिकांसाठी पैसे मोजण्याची वेळ आलेली आहे. तर उपलब्ध वाहनचालकांचीही आपत्कालीन परिस्थितीत तारांबळ उडत आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय हे सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक अशी यंत्रणा आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू वर्गासाठीही मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे केंद्र म्हणजे शासकीय रूग्णालय, गावागावातून तसेच शहरातील रूग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात विविध चाचण्या पुरवणे, मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे तसेच रात्री अपरात्री अडल्या नडल्यांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी तत्पर राहण्याचे काम जिल्हा रूग्णालययाकडून होणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांचे सर्व कर्मचारी तसेच सर्व यंत्रणा योग्य रितीने कार्यान्वित असणे गरजेचे आहे. मात्र सध्या जिल्हा रूग्णालयाची परिस्थिती पाहता रूग्णालयात कायमस्वरूपी कर्मचार्यांव्यतिरिक्त कंत्राटी कर्मचार्यांचीच गर्दी जास्त आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात सध्या ४० रूग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र या रूग्णवाहिकांची सेवा पुरविण्यासाठी फक्त १७ वाहनचालक सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपलब्ध आहेत. या वाहन चालकांना या रूग्णवाहिका चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापैकी काही रूग्णवाहिका तर अनेक दिवस चालविल्या न गेल्याने रूग्णालयातच धुळ खात पडून आहेत. www.konkantoday.com