माकडांच्या उपद्रवाने हैराण कोकण रेल्वेला सुमारे ६ लाख ६२ हजार ६६३ रुपये इतक्या अंदाजित खर्चाची निविदा काढण्याची वेळ

0
95

कोकण रेल्वेच्या संपूर्ण ट्रॅकचे विद्युतीकरण झाले आहे.  याच विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स तसेच मास्टवर रानातली माकडे उड्या मारू लागल्याने कोकण रेल्वेला मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या माकडामुळे रेल्वेच्या विद्युत प्रवासात खंड पडू नये व वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी कोकण रेल्वेला सुमारे ६ लाख ६२ हजार ६६३ रुपये इतक्या अंदाजित खर्चाची निविदा काढण्याची वेळ आली आहे.
आतापर्यंत शेती, बागायतींमध्ये माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. पण आता कोकण रेल्वेसारखी यंत्रणाही या माकडांच्या उपद्रवातून सुटलेली नाही. कोकण रेल्वेच्या मार्गावरील माकड प्रवणमध्ये रत्नागिरी ते राजापूर या भागांचा समावेश आहे. या मार्गावर बाकीच्या ठिकाणी परिस्थिती ठिक आहे. पण रत्नागिरी, राजापूर क्षेत्रातील मार्गावर माकडांच्या उड्या जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे हा होणारा उपद्रव रोखण्यासाठी कोकण रेल्वेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पाऊल उचलले आहे. ऍन्टी क्लाइबिंग उपकरणे रेल्वेमार्गावर विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स तसच मास्ट यावर कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होवून गेल्या वर्षी पूर्णत्वास गेले. त्यानंतर या नव्या उपक्रमाचे लगेच लोकार्पणही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेची प्रशंसाही केली होती. त्ययामुळे आता या पूर्ण केलेल्यया मार्गावर विद्युत इंजिनसह रेल्वेगाड्या धावत आहेत. पण ही विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स तसेच मास्ट यंत्रणेला रानातल्या माकडांचा उपद्रव बाधा ठरू लागला आहे. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here