होणार्या पतीसोबत खोलीत असताना चारजणांनी काढला अश्लिल व्हिडिओ,दोन अल्पवयीनसह चार जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरानजिक असलेल्या नाचणे येथे झालेल्या एका पार्टीध्ये महिलेच्या होणार्या पतीसोबत अश्लिल व्हिडिओ काढणार्या दोन अल्पवयीनसह चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
शहर पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीपैकी एकाला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. नाचणे येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत तक्रारदार महिला ही त्याच्या होणार्या पतीसोबत गेली होती. तसेच या ठिकाणी आरोपी पुरूष तसेच त्याची मैत्रिण व अन्य दोन अल्पवयीन उपस्थित होते. पार्टी सुरू असतानाच तक्रारदार व तिचा होणारा पती एका खोलीत असताना त्यांचा अश्लिल व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा संशय या महिलेला आला. आपला व्हिडिओ संबंधितांकडून सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला, असा संशय पिडीत महिलेला आला. त्यामुळे या महिलेने चौघा संशयितांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com