मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 386 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली
रत्नागिरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांच्या अंड्यांचे संवर्धन गेल्या वर्षीपासून सुरू आहे.आतापर्यंत किनाऱ्यावर कासवांची 48 घरटी झाली असून त्यामधून 4 हजार 891 अंडी संवर्धित केली गेली आहेत. त्यापैकी 386 पिल्ले आज समुद्रात सोडण्यात आली.
ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे संवर्धन मालगुंड समुद्रकिनारी सुरू आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी पहिले घरटे उघडून 68 पिल्ले समुद्रात झेपावली होती. त्यानंतर काल 5 घरटी उघडण्यात आली. त्यातीत 386 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावेळी मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, वनविभागाचे गावडे, जिल्हा नियोजनचे अधिकारी मुळये, युवासेनेचे तालुका समन्वयक साईनाथ जाधव, संदीप कदम, शेखर खेऊर, कासवमित्र ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर उपस्थित होते.
कासवाची अंडी संवर्धित करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून थोड्या अंतरावर ही अंडी ठेवली जात आहेत. हे सर्व काम कांदळवन कक्ष आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ऋषिराज जोशी आणि रोहित खेडेकर हे कासव मित्र म्हणून काम करत आहेत
www.konkantoday.com