
रुंदीकरणात जात असलेला भव्य बंगला कोणतेही मोडतोड न करता नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने मागे सरकविला जाणार, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच घटना
मुंबई गोवा हायवे व रत्नागिरी नागपूर हायवे साठी अनेकांच्या जागा चौपदरी करण्यासाठी गेल्या त्यामुळे अनेकांना आपले मूळ घरे पाडावी लागली होती काहींनी जुनी घर पाडून सुरक्षित अंतरावर आपली नवीन घरे उभी केली मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील करंजारी येथील ठाकूर यांनी आपला बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आहे त्या अवस्थेत मागे घेण्याचा निर्णय घेतला बंगल्याची कोणतीही मोडतोड न करता आहे त्या अवस्थेत बंगला मागे नेण्याचे तंत्रज्ञान चेन्नई येथील कंपन्या करतात करंजारी येथील ठाकूर यांचा बंगला चौपदरीकरणात जात होता तो बंगला आता शंभर फूट मागे सरकविला जाणार आहे त्यासाठी चेन्नई येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आला असून या कंपनीने आपले काम सुरू केले आहे कंपनीने बंगल्याच्या खाली खाली खोदाई करून त्याखाली जॅक व लोखंडी अँगल लावून हा मूळ बंगला हळूहळू सरकवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे कुठलीही मोडतोड न करता आहे त्या अवस्थेत बंगला मागे नेला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच बंगला मागे नेण्याची घटना आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करीत आहेत
Www.konkantoday.com

