पहिल्या २ महिन्यातच तारांगणाद्वारे नगर परिषदेला १२ लाख ५६ ह जार ८०० रुपयांचे उत्पन्न
रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण मागील १६ डिसेंबरला रत्नागिरीकरांच्या सेवेत रूजू झाले. या तारांगणाला उत्तम प्रतिसाद लाभत असून पहिल्या २ महिन्यातच या तारांगणाद्वारे नगर परिषदेला १२ लाख ५६ ह जार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तारांगण सुरू झाल्यापासून २६ फेब्रुवारीपर्यंत अनेक शालेय सहलींनी या तारांगणाला भेट दिली. या सहलीतून नगर परिषदेला तब्बल १० लाखांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती नगर परिषदेने दिली.
रत्नागिरीतील हे तारांगण महाराष्ट्रातील पहिले व राष्ट्रीय पातळीवरील पाचवे ऍक्टीव्ह थ्रीडी तारांगण आहे. ११ कोटी ५८ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या तारांगणाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ डिसेंबर रोजी झाले होते. रत्नागिरीत येणार्या शालेय सहलींचा तारांगणाला मिणणारा प्रतिसाद वाढत गेला. लातूर, बीड, परभणी, पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर आदी भागातून ५० पेक्षा अधिक सहली या तारांगणाला भेट देवून गेल्या.
नगर परिषदेला २० डिसेंबर ते २६ फेब्र्रुवारी या काळात एकूण १२ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. सध्या या तारांगणात ठराविक शो दाखवले जात आहेत.
पुढील टप्प्यात तारांगणात खगोलशास्त्र जाणकारांची नियुक्ती, प्रदर्शन कक्ष व कत्रात खगोल अभ्यासातील साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर व्याख्यान कक्षही सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरातील हे तारांगण खगोलशास्त्राची ओळख करून देतानाच शहरासह जिल्ह्यांच्या पर्यटन क्षेत्रात वाढ करण्यात सहाय्यभूत ठरत आहे. www.konkantoday.com