अमित शहा लवकरच कोकण दौर्‍यावर -प्रमोद जठार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी आगामी येणार्‍या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यासाठी बुथ पातळीपर्यंत बांधणी केली आहे. या मतदार संघातून भाजपाचा उमेदवार लढणार आणि खासदारही होणार असल्याचे भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणात लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा होणार असून रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत सभा होण्यासाठी आग्रही असल्याचे जठार यांनी सांगितले. येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी जठार यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. भाजपाचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा सुरू आहे. देशातील भाजपा पदाधिकारी, खासदार, मंत्री मतदार संघात जावून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्यात का हे पहात आहेत. प्रथम मंत्री वाडीवस्तीवर जावून योजना अंमलबजावणीची खातरजमा करत असल्याचे यावेळी जठार यांनी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button