गुहागर तालुक्यातील नवानगर मोहल्ला येथे वृद्ध महिलेला एसटीचे धडक दिल्याने महिलेचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील नवानगर मोहल्ला बसथांब्याजवळ सकाळी एका वृद्ध महिलेल्या अंगावरुन एस.टी. गेली. या अपघातात 65 वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली.या घटनेत पोलीसांनी एस.टी.चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी (ता. 2) गुहागर आगारातून सुटणारी गुहागर धोपावे मार्गे वेलदूर ही एस.टी. (एमएच 14 बीटी 2970) नवानगर मोहल्ला येथे सकाळी 10.30 च्या सुमारास आली. सदर एस.टी. चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ रा. चिखली कदमवाडी वय 54 हे चालवित होते. या एस.टी.वर विजय विठ्ठल पवार रा. शृंगारतळी वय 33 हे वाहक होते. नवानगर मोहल्ला थांब्यावर एसटीतील काही प्रवासी उतरले. वेलदूर, गुहागरला जाणारे प्रवासी गाडीत बसले. त्यानंतर एस.टी. सुरु झाली. बस थांब्यापासून एस.टी. सुमारे 10 ते 15 मीटर इतकीच पुढे आली. इतक्यात नवानगर गावातून येणाऱ्या छोट्या पायवाटेवरुन मालती विठू रोहीलकर (वय 65, रा. नवानगर) ही महिला रस्त्यावर आली. प्रवाशांची चढ उतार करुन निघालेल्या एस.टी.चालकाला अचानक समोर आलेली महिला दिसलीच नाही. त्यामुळे एस.टी.ची धडक महिलेला बसली व महिला एस.टी. खाली पडली. दुर्दैवाने एस.टी.ची मागची चाके मालतीच्या कंबर व पाठीवर गेली आणि जागीच मालती रोहीलकरचा मृत्यू झाला.