सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैदराबाद आणि दक्षिणेस म्हैसूर या देशातील अत्यंत महत्त्वाच्या शहरांशी विमानसेवेने जोडला जाणार
सिंधुदुर्ग विमानतळावरून आता अलायन्स एअरची नव्याने दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईसोबतच आता हैदराबाद व म्हैसूर ही महत्त्वाची शहरे सिंधुदुर्गला विमानसेवेने जोडली जाणार आहेत.सुरुवातीला आठवडय़ातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी यांनी दिली.
आयआरबी इन्फ्राने सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी, परुळे येथे हे विमानतळ विकसित केले आहे. या जिह्याच्या विकसात भर टाकणाऱया सिंधुदुर्ग विमानतळावरून गतवर्षीपासून अलायन्स एअरची सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमानसेवा सुरू आहे. सध्या अलायन्स एअरची सिंधुदुर्ग – मुंबई आणि मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा आठवडय़ातून पाच दिवस चालू आहे. आता या विमानतळावर नव्याने दुसरी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळावरून आता फेब्रुवारीपासून दुसरे विमान उड्डाण करणार आहे.
मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई ही विमानसेवा देणाऱया अलायन्स एअर या पंपनीतर्फेच या हैदराबाद- म्हैसूर – सिंधुदुर्ग – म्हैसूर – हैद्राबाद या दुसऱया विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येणार असून सुरुवातीच्या काळात दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवडय़ातून दोन दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या विमान सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैदराबाद आणि दक्षिणेस म्हैसूर या देशातील अत्यंत महत्त्वाच्या शहरांशी विमानसेवेने जोडला जाणार आहे.विमान पंपनीमार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सदर विमान दर बुधवारी हैदराबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी 5.30 वा. सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी 6 वा. म्हैसूर मार्गे हैदराबादकरिता उड्डाण करेल तर दर रविवारी हैदराबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी 5.30 वा सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी 6.30 वा. म्हैसूर मार्गे हैदराबादकरिता उड्डाण करेल. कोकणातील जास्तीत जास्त प्रवाशांनी या विमानसेवा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे