पोलीस श्वान रॅम्बो च्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे अवघ्या काही तासात संगमेश्वरातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
67

चोरीच्या व खूनाच्या प्रकरणात पोलिसांचा श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असतो रत्नागिरी पोलिसांच्याश्वान पथकातील पोलीस श्वान रॅम्बो च्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे अवघ्या काही तासात संगमेश्वरातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला
संगमेश्वर पोलीस ठाणे येथे झालेल्या चोरीचा छडा पोलिसांनी लावला, १०० टक्के मुद्देमाल जप्त करत अट्टल चोरटा पोलिसांच्या हाती लागला असून यामध्ये पोलीस श्वान रॅम्बो याची महत्वपूर्ण कामगिरी त्याने बजावली आसंगमेश्वर पोलीस स्थानकात घरफोडी च्या गुन्हा दाखल झाला होता. त्यात ६० हजार रुपयांची चोरी झाली होती. यामध्ये घटनास्थळी, अज्ञात चोरट्याचा सुगावा लावण्याकरिता, रत्नागिरी पोलीस श्वान पथकातील श्वान रॅम्बो यास पाचारण करण्यात आले होते. ‘रॅम्बो’ला घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा गंध त्याच्या हँडलेटद्वारे देण्यात आला. हा गंध घेताच ‘श्वान रॅम्बो’ ने घराच्या मागील दरवाजाने बाहेर पडून 360 मिटर च्या अंतरापर्यंत माग काढून इशारा दिला.
ही संपूर्ण प्रक्रिया संपल्या नंतर, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रवीण देशमुख, संगमेश्वर पोलीस ठाणे यांनी या श्वान व तपास पथकास जवळच झालेल्या अन्य एका चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली व घटनास्थळी लागलीच जाण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी हे पथक पोहचले व श्वान रॅम्बो यास घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा त्याच्या हँडलरद्वारे, गंध देण्यात आला.
हा गंध घेताच श्वान रॅम्बोने घराच्या मुख्य दरवाजाने बाहेर पडून गुरांच्या गोठ्याजवळील पायवाटेने 35 मिटर अंतरावर राहत असणाऱ्या सुभाष सोमा ओकटे यांच्या घरात जाऊन श्वानहस्तकांना इशारा दिला.
सुभाष सोमा ओकटे यांच्यावर संगमेश्वर पोलीसांचा पूर्वीपासून संशय होताच व श्वान रॅम्बोने यावर शिक्कामोर्तब केला. यावरून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी सुभाष सोमा ओकटे यास ताब्यात घेण्यात आले व गुन्ह्यात चोरीस गेला मुद्देमाल 60,000/- 100% हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार / श्वान यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.. श्री. प्रवीण देशमुख, स.पो.नि, संगमेश्वर पोलीस ठाणे, 2. श्रीमती. मढवी, स.पो.नि, श्वान पथक, रत्नागिरी,. पो. हवा / सचिन कामेरकर, संगमेश्वर पोलीस ठाणे, 4. पो. हवा / 922 घुगरे, चालक, श्वान पथक, रत्नागिरी, पो. हवा / 317 राणे, श्वान हँडलेट, श्वान पथक, रत्नागिरी, पो. हवा / 831 आंब्रे, श्वान हँडलेट, श्वान पथक, रत्नागिरी व
श्वान ‘ रॅम्बो’, श्वान पथक, रत्नागिरी. यांनी मोलाची कामगिरी बजावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here