
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांसाठी खुले.
रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी एसटी स्टँड चे काम अनेक वर्ष रेंगाळले होते पालकमंत्री उदय सामंत यांनी यामध्ये लक्ष घालून एमआयडीसी कडून निधी उपलब्ध करून अत्याधुनिक असे एसटी स्टँड प्रवाशांसाठी बांधून दिले त्याचा लोकार्पण सोहळा काल पार पडला आज पासून या एसटी स्टँड मधून बाहेर गावी जाणाऱ्या तसेच ग्रामीण व शहर वाहतुकीच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे हे बसस्थानक प्रवश्यांसाठी खुले झाले आहे. आज पहिल्यांदाच ग्रामीण भागातील व जिल्ह्याबाहेरुन येणार्या प्रवाश्यांचे बसस्थानकात आगमन झाले तेव्हा त्याने आनंद व्यक्त केला या एसटी स्टँडचे काम रेंगाळल्यामुळे गेले अनेक वर्ष पुन्हा पावसात स्टॅन्ड समोरील बाजूस प्रवासी एसटी गाड्यांची प्रतीक्षा करीत होते त्यामुळे सुसज्ज बसस्थानक सुसज्ज असे उभे राहिलेले पाहून प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले.गेले अनेक वर्ष रहाटाघर येथून प्रवाश्यांना गाडी पकडण्यासाठी जावे लागत होते. त्याचा खूप त्रास होत होता.




