रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर साखरीआगरयेथे ९ महिन्यांच्या बाळाचा घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यु
रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ९ महिन्यांच्या बाळाचा घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यु झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील साखरी आगर गावात ही दुदैवी घटना घडली आहे.
रिहांश तेरेकर (वय ९ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रिहांशला घरात पडलेले चॉकलेट दिसले त्याने ते तोंडात टाकले नकळत ते खाताना त्याच्या घशात अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
दरम्यान, कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी गावातील एका डॉक्टरांकडे नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच रिहांशचा बाळाचा मृत्यू झाला.
रिहांशच्या अचानक अशा निघून जाण्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेमुळे साखरी आगर गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद गुहागर पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com