जेली चॉकलेट खाल्ल्याने 9 महिन्याच्या बालकाचा मृत्यू
गुहागर : तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील ९ महिन्याच्या बालकाने घरात पडलेले जेली चॉकलेट खाल्याने मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना बुधवारी घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दि. २५ जानेवारी रोजी घरामध्ये हे बालक खाली जमिनीवर खेळत होते. याचवेळी जमिनीवर पडलेले जेली चॉकलेट तोंडात घातल्याने हे चॉकलेट घशामध्ये अडकले. घरच्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी बाळाला दवाखान्यात नेत असतानाच वाटेत बाळाचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे करत आहेत. गुरुवारी या बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.