
गवत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला लागलेली आग आणली आटोक्यात
रत्नागिरी : जनावरांना गवत घेऊन जाणार्या टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नजीकच्या एकता नगर येथे घडली. नगर परिषद व एमआयडीसीच्या अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली. गजानन पद्माकर आगाशे (रा. रत्नागिरी) हे एकता नगर येथील डेअरीफार्मसाठी गवत घेऊन आले होते. यावेळी विद्युत तारांमधून स्पार्किंग झाल्याने टेम्पोतील गवताने पेट घेतला. हा प्रकार जागरुक नागरिकांनी यंत्रणेला कळवल्यानंतर दोन्ही बंब घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोतील गवत पेटले तर आगीपासून टेम्पोला वाचवण्यात यश आले.