
कोंडये येथे पकडला गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करणारा ट्रक
राजापूर : राजापूर तालुक्यातील कोंडये येथे गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्कच्या राज्य भरारी पथकाने पकडला. ट्रकमध्ये ( बीजे-झेड 7501) गोवा बनावटीच्या मद्याचे सुमारे 700 बॉक्स आढळून आले. ट्रकसह मद्याची किंमत 50 ते 55 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. राज्य भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक लाड यांच्यासह दुय्यम निरीक्षक सतिष इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला होता. शनिवारी दुपारी हा ट्रक कोंडये येथील शाळेजवळ थांबवून तपासणी केली असता मद्याचे बॉक्स आढळून आले.




