एसटी बस चालवत असताना चालकाला आली चक्कर, सुदैवाने प्रवासी बचावले
खेड : मुंबई – गोवा महामार्गावर वेरळ येथील रेल्वे स्थानक फाट्याजवळ शनिवारी दि.२८ रोजी सायंकाळी शिरगाव येथे जाणाऱ्या एसटी बस चालकाला धावत्या बसमध्ये चक्कर आली. यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले मात्र सुदैवाने त्याही परिस्थितीत
एसटी चालकाने ब्रेक लावल्याने एसटी बस रस्त्या कडेला उभी राहिली आणि मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. २८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शंकर शिरसाट (३८, रा.खेड) असे या चालकाचे नाव आहे. वाहक आणि प्रवासी यांनी चालकाला भरणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.