
पानवल येथे एसटीची कारला पाठीमागून धडक
रत्नागिरी : रत्नागिरी – नागपूर मार्गावर पानवल येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात गुरुवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास झाला. यात एसटी बसने पुढे असणार्या दोन वाहनांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी धडक दिलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी रत्नागिरी-कोल्हापूर-गडहिंगलज ही एसटी बस पानवल थांब्याजवळ आली असता पुढे असणार्या कारला (एमएच 08 एक्स-5655) जोरदार धडक दिली. त्यानंतर ती कार पुढील इनोवा क्र. एमएच 08 जी. 0281 (एमएच 08 जी. 0281 ) गाडीवर धडकली. या घटनेत तीन वाहने एका मागोमाग जोरदार धडकल्याने अपघात झाला.