कोकणातील पहिले स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे रत्नागिरीत कार्यरत
रत्नागिरी : कोकणातील पहिले स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे रत्नागिरी येथे जिल्हा पोलिस दलात सुरू झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हे पोलिस ठाणे सुरू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात नियमित 18 पोलिस ठाणी आहेत. आता सायबर ठाणे मिळून 19 पोलिस ठाणी झाली आहेत. या सायबर पोलिस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, आर्थिक गुन्हे शाखा पोलिस उपअधीक्षक राजेश कानडे, पोलिस उपअधीक्षक सुदाम माने, पोलिस निरीक्षक हेमंत शहा, पोलिस निरीक्षक निशा जाधव, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सायबर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नितीन पुरळकर आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र टीम असणे आवश्यक असल्याची गरज लक्षात घेत ही यंत्रणा आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याद्वारे सुरु करण्यात आली आहेत.