गुरे वाहतूक करणाऱ्याला 9 हजारांचा दंड
रत्नागिरी : पाली-देवळे रस्त्यावर गुरे वाहतूक करणाऱ्याला न्यायालयाने 9 हजार 200 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. शशांक संजय सावंत (रा. साठरेबांबर-सावंतवाडी, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत पाली ते देवळे रस्त्यावर घडली होती. शशांक सावंतकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना पिकअप वाहन ( एमएच-०८डब्ल्यू -३६३१) मधून गुरे वाहतुकीचा परवाना नसताना गाडीमध्ये तीन बैल गाडीच्या हौद्यात बांधून त्यांची वाहतूक सुरू होती. ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बुधवारी हा खटला दुसरे न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत, संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.