वाशिष्ठी नदीचे पूजन करून भरली ओटी
चिपळूण : येथील महिलांनी वाशिष्ठी नदी पूजेची परंपरा सुरू केली आहे. याद्वारे आगळावेगळा हळदी-कुंकू समारंभ त्यांनी केला. गोवळकोट भोईवाडी येथील महिलांनी 23 हळदी-कुंकू समारंभानिमित्त गावाशेजारून वाहणार्या वाशिष्ठी नदीचे पूजन करून तिची ओटी भरली. नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोई समाजाच्या महिलांनी हा अनोखा उपक्रम राबवला.