
रत्नागिरी – शेट्येनगर येथे झालेल्या स्फोटातील गंभीर घरमालकाचा मृत्यू
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शेट्येनगर येथील चाळीत झालेल्या स्फोटाने गंभीर भाजलेल्या घरमालक अशफाक काझी यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री 10 च्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या तीन झाली आहे. बुधवारी पहाटे गॅसच्या स्फोटामुळे चाळीचा स्लॅब उडाला होता तर कोसळलेल्या स्लॅबखाली सापडून अशफाक काझी यांची पत्नी कनिज काझी, सासू नुरूनिस्सा अलजी यांचा मृत्यू झाला होता. तर वडील-मुलगा गंभीर जखमी झाले होते. सोमवारी रत्नागिरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.