चिपळूण तालुक्यातील कान्हे येथून वृद्धा बेपत्ता

चिपळूण :  कान्हे-कदमवाडी येथून वृद्धा बेपत्ता झाल्याची नोंद अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात  करण्यात आली आहे. वासंती विठ्ठल कदम (70, कान्हे-कदमवाडी) असे तिचे नाव आहे. याबाबतची खबर विठ्ठल चंदू कदम   (वय 74, कान्हे-कदमवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासंती कदम यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्या कोणालाही न सांगता दि. 17 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता घरातून निघून गेल्या.  त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे एन. एस. चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button