
करबुडे येथे तरुणीने केले विषप्राशन
रत्नागिरी : अज्ञात कारणातून विषारी द्रव्य प्राशन केल्याने करबुडे येथील तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. ही घटना रविवार 22 जानेवारी रोजी घडली आहे. तिला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.