रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रौढ आढळला बेशुद्धावस्थेत
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या अज्ञात प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. बुधवार 18 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता रेल्वे पोलिस सागर पाटील यांना रेल्वे स्टेशनवर एक प्रौढ बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तातडीने त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गुरुवार 19 जानेवारी रोजी रात्री 12.30 वा. उपचारांदरम्यान त्या प्रौढाचा मृत्यू झाला. या बाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.