
शिंदे गटातील किती आमदार भाजपात जातात, हे येणारा काळ ठरवेल : आ. भास्कर जाधव
रत्नागिरी : भाजपकडून बलाढ्य शिवसेनेला संपवण्यासाठी प्रयत्न केले गेले; परंतु शिवसेना संपणारी नाही. शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. आता शिंदे गटातील किती आमदार भाजपमध्ये जातात, भाजपसोबत असणार्या शिंदे गटाचे काय होईल, याचे उत्तर येणार काळच देईल, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केले. भाजपने प्रत्येकवेळी गरजेपुरतेच छोट्या पक्षांना जवळ घेतले त्यानंतर त्यांचे हाल काय झाले हे प्रत्येकाला माहीत आहे. महादेव जानकार, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची उदाहरणे देता येतील. या छोट्या पक्षांना जवळ घेतले, ते पक्ष किती वाढले. गरजे पुरताच त्याचा वापर भाजपाकडून केला जातो. लोकशाही वाचवायची असेल तर शिंदे गटातील सर्व आ. तत्काळ निलंबित केले पाहिजे. पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याला गट करणे मान्यच नाही. त्यामुळे पक्षातून बाहेर गेले त्यांना दोनच पर्याय असतात. त्यांचे ताबडतोड निलंबन किंवा दुसर्या पक्षात जाणे हा होय, असे आ. जाधव म्हणाले.