शहर विकासासाठी समिती स्थापणार ,देवरुखच्या नगराध्यक्षा साै.मृणाल शेटये यांचा स्तुत्य उपक्रम

देवरुख शहराच्या विविध विकास उपक्रमांमध्ये शहरातील मान्यवरांना सामावून घेण्यासाठी एक समिती स्थापन्याचा स्तुत्य निर्णय देवरुखच्या नगराध्यक्षा साै.मृणाल शेटये यांनी घेतला आहे.देवरुख शहर हे आदर्श मॉडेल शहर ठरावे यासाठी शेटये यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यानी नुकताच काही नगरपालिकांचा आपल्या सहकाऱ्यांसह अभ्यास दौरा केला. त्या भागातील नगर परिषदेने राबवलेले चांगले उपक्रम या ठिकाणी राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. देवरुखवासियांना चोवीस तास पाणी पुरविण्याच्या दृष्टीनेही योजना आखली जात आहे.मलप्रक्रिया प्रकल्प सुका कचरा संस्करण आधी प्रकल्प राबविताना नागरिकांना विश्वासात घेतले जाणार आहे. शहर विकासात नागरिकांचा सहभाग घेतला तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल यामुळे त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.या समितीमध्ये देवरुखमधील डॉक्टर्स, वकील, अभियंते, कला, क्रीडा सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात येणार आहेत.या सर्वांना एकत्र आणून शहर विकासाचे काम जोमाने केले जाणार आहे.शहरातील नागरिकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांबाबत नागरिकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय नगरपालिकेकडून घेतले जातात.मात्र देवरुख नगर पंचायतने उचललेल्या पावलामुळे ही नगर परिषद जिल्ह्यात अपवाद ठरणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button