
रत्नागिरी येथील स्फोटात 1 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त नुकसान
रत्नागिरी : आशियाना गृहनिर्माण सोसायटीमध्ये झालेल्या स्फोटामुळे इमारतीचा मोठा भाग बाधित झाला आहे. या स्फोटात नुकसान झालेल्या ठिकाणांचे तलाठी व कर्मचार्यांनी गुरुवारी पंचनामा केला. अर्ध्याहून अधिक इमारतीची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. आशियानामधील 14 कुटुंबियांचे तब्बल 89 लाख 92 हजाराचे नुकसान झाले आहे. या चाळीच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 99 लाखांहून अधिकचा खर्च अपेक्षित असल्याचे महसूल विभागाने नोंदवले आहे. या घटनेत परिसरातील 13 घरांचे सुमारे 9 लाख 85 हजाराचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी 12 लाखांहून अधिकचा खर्च अपेक्षित आहे.