
पिरलोटे साईनगर येथे प्रौढाचा मृत्यू
खेड : तालुक्यातील पिरलोटे साईनगर येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची बाब दि.18 रोजी उघड झाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार, रणजित बसंत सिंह (वय 52, सध्या रा. पिरलोटे धामणदेवी, साईनगर ता. खेड, मूळ ब्राडता, ता. सरकाघाट, जि. मंडी, राज्य हिमाचल प्रदेश) याला दारूचे व्यसन होते. तो पिरलोटे साईनगर ता. खेड येथे वास्तव्यास होता. दि. 18 रोजी सकाळी 7.45 वा. च्या सुमारास त्याच्या राहत्या खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. कोणत्यातरी अज्ञात कारणाने त्याचा दि.15 रोजी दुपारी 3 वा. ते दि.18 रोजी सकाळी 7.45 वा. च्या दरम्यान मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.